रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीना ब्रॉडबँड व्दारे जोडण्याचे काम वेगाने सुरू
(आनंद पेडणेकर)
भारत सरकारचा बहुउद्देशीय प्रकल्प महानेट चे काम रत्नागिरी येथे सुरू झाले आहे. सर्व ग्राम पंचायतिना ब्रॉडबँड व्दारे जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्या साठी खाजगी ठेकेदाराकडून अंडरग्राऊड तसेच ओव्हार हेड ऑप्टीकल फायबर टाकण्यास सुरवात करण्यात आली आहे . रत्नागिरी शहरात ओव्हरहेड ऑप्टिकलवायर टाकण्यात महावितरणच्या संयोगाने टाकण्यात येत असून विज मंडळाच्या दोन पोलमध्ये फायबर पोल उभाकरून ही जोडणी केली जात आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हातील ग्रामपंचायंती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत. IP-MPLS टेक्नोलॉजीचा वापर काण्यात येणार असून सदरच्या ग्रामपंचायती मधून वाय – फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.
www.konkantoday.com