
भाजपाच्या पाठपुराव्यामुळे स्टेट बँक कॉलनी येथील कामाला सुरुवात
नगरसेवक उमेश कुळकर्णी व प्रवीण देसाई यांनी दिले होते निवेदन
रत्नागिरी- शहरातील प्रभाग क्र. ३ मधील स्टेट बॅंक कॉलनी परिसराची दयनीय अवस्थेबाबत नगरपरिषदेकडे निवेदन, पाठपुरावा केल्यानंतर आता दुरुस्तीच्या कामांना सुरवात झाली आहे. कॉलनीमधील गटारे, त्यावरून गेलेली पाण्याची पाईपलाईन व तुंबणारे पाणी या समस्या सोडवण्यात येत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई, नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले हाेते. त्यानुसार कालपासून कामाला सुरवात झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधील स्टेट बॅंक कॉलनी परिसरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. रवी भोसले यांच्या घरासमोरील गटाराची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक उमेश कुळकर्णी व प्रवीण देसाई यांनी केली होती.आता हे काम भाजपाच्या पाठपुराव्यामुळे होत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले
www.konkantoday.com