
चिपळूण शहरातील महापुरानंतर जमा झालेला कचरा कामथे घाट परिसरात टाकला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
महापुरानंतर जमा झालेला शहरातील कचरा तालुक्यातील कामथे घाट परिसरात टाकला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कचर्यामुळे गावासह आजुबाजूच्या परिसरातही रोगराई पसरण्याची शक्यता असून नदी किनारी असणार्या पाणी योजनाही दूषित होण्याची भीती वर्तविली जात आहे. याच अनुषंगाने कामथे खुर्द ग्रामपंचायतीने प्रांताधिकारी प्रविण पवार यांना लेखी पत्रव्यवहार करून गावाबाहेर येणारा कचरा तात्काळ थांबवावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान पंचायत समितीच्या सभापती सौ. रियाताई कांबळे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी घटनास्थळी भेट देत कचर्याची पाहणी केली.
www.konkantoday.com