खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचे सडेतोड उत्तर
लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेत राज्याच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. याला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. तसेच शिवसेनेलाही आरक्षणावरून अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले.
“सर्वजण फिरून फिरून मराठा आरक्षणावर येत आहेत. दुसरा कोणता विषय येथे मांडताना दिसत नाही. राज्यांना राज्याचा निर्णय घेण्याचा निर्णय का बहाल करण्यात आला?. २०१८ नंतर केंद्राने सर्व अधिकार आपल्या ताब्यात ठेवले आहेत, अशी राज्यांना धास्ती होती. त्यानंतर केंद्राने राज्यांचे अधिकार राज्यांना देण्यासाठी पाऊल उचललं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडलं. “आज ओबीसीची राज्यात जी परिस्थिती आहे. आमचं अस्तित्वात असलेलं आरक्षण घालण्याचं पाप राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. हा समाज या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडण्यात कमकुवत ठरले आहात.”, असा निशाणाही प्रीतम मुंडे यांनी साधला
www.konkantoday.com