कोकण रेल्वेच्या रेल कामगार सेना युनिटला चिपळुण, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक नवीन रूग्णवाहिका -ना. उदय सामंत
कोकण रेल्वेच्या रेल कामगार सेना युनिटला चिपळण, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक नवीन रूग्णवाहिका देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी केली. कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त युनिटसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन, रेल कामगार सेना युतीने दणदणीत विजय मिळवून भगवा फडकावला आहे. नॅशनल मजदूर युनियनची गेल्या चार वर्षातील कोकण रेल्वेतील मक्तेदारी या युतीने मोडीत काढली आहे.
रेल कामगार सेनेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर सावंत, कार्याध्यक्ष विलास खेडेकर, अपाध्यक्ष विश्वास राणे, ट्रॅकमन धोरण समितीचे अध्यक्ष कनोजिया, रनिंग स्टाफ कमिटीचे सचिव कौस्तुभ ढेकणे, पी. पी. कांबळे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबु म्हाप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com