सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात येताना विश्वास वाटला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे पोलीस दल अव्वलस्थानी आहेच; मात्र सर्वच पोलीस ठाण्यांमधील वातावरण हे पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर सर्वसामान्य जनतेला आपले वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात येताना विश्वास वाटला पाहिजे तर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घाम फुटला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सोमवारी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्पोझिट इनडोअर फायरिंग रेंजसह विविध क्रीडा प्रकल्पांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.
www.konkantoday.com