
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची छाप आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटवली
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची छाप आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटवली आहे. निशा ओली, नितेश परभुलकर व प्रणय फराटे यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने तयार केलेल्या कलाकृतींची आयडब्ल्यूएस रशियाच्यातर्फे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय जल रंग महोत्सवात निवड झाली आहे. भारतातून निवड झालेल्या २१ कलाकृतींपैकी या तीन कलाकृतींचा समावेश असून चिपळूणसह कोकणातील या युवा कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आयडब्ल्यूएस रशियाने आपला पहिला आंतराष्ट्रीय जल रंग महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये ७० देशांतील ७०० कलाकारांनी सहभाग घेतला.
www.konkantoday.com