
राज्य शासनाने डिझेल परताव्यासाठी पाच जिल्ह्यांसाठी ३० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे हंगामातील सुरूवातीला मच्छिमारांना दिलासा
राज्य शासनाने डिझेल परताव्यासाठी पाच जिल्ह्यांसाठी ३० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला ६ कोटी ४० लाख रुपये मिळणार आहेत.
शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल तेलावरील मूल्यवर्धीत कर प्रतिपूर्ती या योजनेसाठी साठ कोटींची तरतूद करण्यात आली होती परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निधी मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आला नव्हता.
www.konkantoday.com