राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढील महिन्यात
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यावर असलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतल्याने राज्यात आता जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये मतदान अपेक्षित आहे. निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा बँकेत मुंबै बँकसह नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर बँकेचा समावेश आहे. या बँकांवर सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळाची मुदत ६ मे २०२० मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल सव्वा वर्षांनंतर जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.
www.konkantoday.com