रसायनमिश्रित पाणी थेट नाल्यामध्ये सोडले, खाडीपट्ट्यातील शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान, राष्ट्रवादीचा सीईटीपीआर वर मोर्चा
तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लोटेतील सीईटीपी येथे काल निषेध मोर्चा काढण्यात आला. लोटेतील कारखानदारांनी सीईटीपी, एनआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ या तिन्ही संस्थांच्या आशीर्वादाने आणि संगनमताने पावसाचा फायदा घेत, रसायनमिश्रित पाणी थेट नाल्यामध्ये सोडले. त्यामुळेच खाडीपट्ट्यातील शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले, असा आरोप या मोर्चेकर्यांकडून सीईटीपी व लोटेतील कारखान्यांवर केला.
पावसाने २२ जुलैला खेडला झोडपले. या निसर्गाच्या रौद्र अवताराचा फायदा लोटे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखानदारांनी घेतला. पावसाच्या पाण्याबरोबरच रासायनिक सांडपाणी कोणतीही प्र्रक्रिया न करताच नाल्यामध्ये सोडले. हेच घातक रासायनिक सांडपाणी पुढे जावून खाडीला मिळाले. परिणामी किनारपट्टीवरील बहुतांश गावांमधील शेतामध्ये हे पाणी घुसले. त्यामध्ये भातशेतीचे नुकसान झाले.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य नफीसा परकारयांनीकेले
.www.konkantoday.com