
नाम फाऊंडेशनमार्फत पूरग्रस्तांना मदतीचा हात
महापुराने उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना नाम फाऊंडेशनच्यावतीने मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून मदतीचा हात देण्यात आला. विविध प्रकारचे जीवनावश्यक साहित्यांचे वाटप नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.
चिपळूण परिसरातील अनेक ठिकाणी मदतीचा हात नाम फाऊंडेशनने दिला आहे. सुमारे २ हजार २७४ कुटुंबापर्यंत मत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये धान्य, ब्लँकेट, पाणी बॉक्स, चादर, गाऊन्स, भेळ, फिनेल, टॉवेल, साड्या, मेडिसीन, चिखल साफ करण्यासाठी पाण्याचे १० पंपसुद्धा उपलब्ध करून दिले.
www.konkantoday.com