टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरूज्जीवन होणार
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्र्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरूज्जीवन होणार आहे. तसेच टिळक मेमोरियल विभागीय ग्रंथालयही आधुनिक करण्यात यणार आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपकेंद्रात टिळक अध्यासनाची सुरूवात झाली. याला दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरूज्जीवन करण्याची सूचना ऍड. विलास पाटणे यांनी केली होती. ती मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पूर्ण केली आहे.
शताब्दी स्मृती कार्यक्रमात ऍड. विलास पाटणे यांनी जन्मस्थानाचे नुतनीकरण, टिळक वाचनालय नुतनीकरण व विद्यापीठ उपकेंद्रात टिळक अभ्यासन कामे सुचविली होती. ना. सामंत यांनी तत्वतः मान्यत केली. लोकमान्य टिळक सार्या देशाचे मानबिंदू आहेत परंतु, टिळकांचा जन्म रत्नागिरीतील असल्यामुळे विशेष महत्व आहे. सुमारे दहा कोटींची कामे मार्गी लागली. यातून टिळक जन्मस्थानचे जतन व टिळकांचे विचार नव्या पिढीसमोर जातील, यामुळे आनंद व समाधान आहे.
www.konkantoday.com