
गाव कृती आराखड्यामध्ये प्रत्येक आराखड्यामध्ये प्रत्येक कुटुंबाना समाविष्ट करून त्यांना नळ जोडणी देण्यात यावी-मा. डॉ. इंदुराणी जाखड zpratnagiri
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. गाव कृती आराखड्यामध्ये प्रत्येक आराखड्यामध्ये प्रत्येक कुटुंबाना समाविष्ट करून त्यांना नळ जोडणी देण्यात यावी असे आवाहन मा. डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर पाणी प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट असून, यामध्ये योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणी पुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करून देणे आहे.
शासनाच्या जलन जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा मिळणेसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून गाव कृती आराखडा पंधरवडा सुरू आहे. सदर अभियान कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोबो कलेक्ट ह्या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून जिल्हा, तालुका व गांव पातळीवर करणेत येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने सदरची गांव कृती आराखड्याची प्रक्रिया राबविणेत येत आहे.
गावाचा गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कक्षाच्यावतीने पहिल्या टप्प्यात मंडणगड, दापोली, राजापूर व दुसर्या टप्प्यात संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी व तिसर्या टप्प्यात चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक/पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्चता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले असून १५ ऑगस्ट २०२१ पूर्वी सर्व आराखडे तयार करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com
