कोव्हॅक्सिन व कोविडशिल्डचे कॉकटेल प्रभावी
जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस कोरोना लशीपाठोपाठ आता भारतातही सिंगल डोस लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविडशिल्ड या दोन लशींच्या एकत्रित (कॉकटेल) डोसचा परिणाम अधिक चांगला येत आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक सुधारते असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com