
केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांचा पहिलाच कोकण दौरा
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे २० ऑगस्ट रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांचा हा पहिलाच कोकण दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राणे मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती आज भाजप कार्यालयातून देण्यात आली.
मुंबई महापालिकेची आगामी निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर या यात्रेची सुरुवात ते मुंबईतून करणार आहे. मुंबईतील राणे यांच्या ताकदीचा फायदा आगामी निवडणुकीत भाजप फायदा घेणार आहेसंपूर्ण जन आशीर्वाद यात्रेत राणे हे आपले पारंपारिक राजकीय विरोधक शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com