
सिंधुदुर्गातील २५ गणेशमूर्ती यंदा आफ्रिका देशात रवाना
भारताप्रमाणेच विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. विदेशात प्रामुख्याने इको फ्रेंडली गणेशमूर्तीची मागणी असते. त्यामुळे खारेपाटण येथील हरेश पांचाळ आणि वेंगुर्लेतील विनय राजापूरकर यांनी खारेपाटण येथील गणेश चित्र शाळेत कागदी लगदा आणि मातीपासून तीन फुटाच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. यातील २५ गणेशमूर्ती यंदा आफ्रिका देशात रवाना झाल्या आहेत.गतवर्षी कोरोनामुळे देश विदेशातून गणेशमूर्तींची मागणी नव्हती. यंदा मात्र आफ्रिका देशातून २५ गणेशमूर्तींची मागणी आली आणि त्याची पूर्तताही तत्काळ करण्यात आली आहे
www.konkantoday.com