
राजापूरमधील नरेंद्र इन्फोटेक या दुकानाला अचानक आग, मोठे नुकसान Rajapur shop fire
राजापूर शहरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली आहे
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नरेंद्र इन्फोटेक या दुकानाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे.
. शॉक सर्कीर्टने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील व्यावसायिक नरेंद्र पावसकर यांचे हे दुकान आहे. सर्व प्रकारच्या संगणकीय सेवा व साहित्य या दुकानात उपलब्ध असते. आगीत दुकान जळून खाक झाले असून पावसकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याचे कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.ही घटना रात्री पावणे नऊच्या सुमाराला घडली
www.konkantoday.com
