मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद cm uddhav thakare
१५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झालाय. पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे.सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. “भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती,” असं म्हणत सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे
www.konkantoday.com