
*मुरादपूर गावी बावनदी* पुलाजवळ देवरुख रस्त्यावरजवळ दुधाच्या गाडीला समोरून समोरून ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
_मुरादपूर गावी बावनदी पुलाजवळ देवरुख रस्त्यावरजवळ दुधाच्या गाडीला समोरून समोरून ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू जागा आहे दुधाच्या गाडीला समोरुन ठोकर देणाऱ्या स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.सिद्धेश गावडे (वय २५, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १०) रात्री पावणे अकराच्या सुमारास मुरादपूर गावी बावनदी पुलाजवळ देवरुख रस्त्यावर शंभर मिटर अंतरावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार आकाश राजाराम सावंत (वय २४, रा. साखरपा भंडारवाडी, ता. संगमेश्वर) हे आपल्या ताब्यातील महिंद्र जितो प्लस वाहन (क्र. एमएच-०८ एपी ३०३९) गाडीत साखरपा येथे स्फुर्ती कंपनीचे दुध भरुन साखरपा देवरुख-रस्त्याने देवरुख दिशेकडे येत असताना रविवारी (ता. १०) रात्री पावणे अकराच्या सुमारास मुरादपूर गावी बावनदी पुलाजवळ देवरुख रस्त्यावर शंभर मिटर अंतरावर आले असता देवरुख दिशेकडून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०८ बीबी ८१९२) वरिल चालक सिद्धेश गावडे याने आकाश सावंत यांच्या गाडीला समोरुन ड्रायव्हरच्या बाजूला ठोकर देऊन अपघात केला. यामध्ये सिद्धेश गावडे गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या सिद्धेश गावडे याला उपचारासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होतो. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. www.konkantoday.com