
काशी विश्वेश्वर मंदिरात आजपासून नामसप्ताह
सालाबादप्रमाणे शहरातील राजिवडा येथील श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताह सोहळा साजरा होणार आहे. आज दुपारी १२.१५ वाजल्यापासून पुढील सोमवारी १६ ऑगस्टपर्यंत दुपारी १२.३० पर्यंत नामसप्ताह सुरू राहणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा कार्यक्रम मांडवी येथील श्री देव भैरी व श्री काशिविश्वेश्वर महादेव यांचा पालखी भेट सोहळा दिंडीच्या तिसऱ्या फेरीला होणार आहे. कोरोनाविषयक शासनाने घालून दिलेले नियम पाळूनच हा नामसप्ताह साजरा होणार आहे. भाविकांनी गर्दी न करता मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करून दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थानने केले आहे.
www.konkantoday.com