आतापर्यंत मुंबई महापालिकेकडे गणेशोत्सव मंडळांचे केवळ १९७ अर्ज दाखल
गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असताना यावर्षी आतापर्यंत मुंबई महापालिकेकडे गणेशोत्सव मंडळांचे के वळ १९७ अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी १४ जुलैपासून अर्ज मागवण्यास सुरुवात केली होती. परंतु के वळ १९७ अर्ज पालिकेकडे आले आहेत. करोनासाथीच्या संकटामुळे गणेशोत्सव मंडळात अद्याप निरुत्साह असल्याचे आढळते.
मुंबईत साधारणत: ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात अशा मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी साधारण तीन हजार मंडळे दरवर्षी पालिकेकडे परवानग्यांसाठी खेटे घालत असतात.
www.konkantoday.com