कोरोना काळातही मुंबईत थुंकणा-यांची कमी होत नाही,नागरिकांकडून ३९ लाख १३ हजारांची दंड वसुली mumbai spitters
कोरोना काळातही मुंबईत थुंकणा-यांची कमी होत नाही. गेल्या सुमारे ९ महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या १९ हजारांपेक्षा अधिक नागरिकांकडून ३९ लाख १३ हजारांची दंड वसुली केली आहेसार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासह अनेक संसर्गजन्य आजारांसाठी निमंत्रण ठरते.
31 lakhs fine received from spitters in mumbai lead to coronavirus
असे असतानाही थुंकणा-यांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेने अशा बेजबाबदार १९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून तब्बल ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली केली आहे,पालिकेने मार्शलच्या माध्यमातून थुंकणा-यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कामात पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. विविध माध्यमातून जनजागृतीही केली जात आहे. मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास सध्या २०० रुपये दंड आकारला जातो. मात्र तरीही लोकांचा बेजबाबदारपणा सुरु असल्याने दंडाच्या रक्कम बाराशे रुपयापर्यंत करण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही करण्याच्या विचारात आहे
www.konkantoday.com