
नववर्ष स्वागत ठेव योजनेचा आज अंतिम दिवस
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज पर्यंत रु.५ कोटी ६० लाखांच्या ठेवी नव्याने पतसंस्थेमध्ये संकलित झाल्या असून संस्थेच्या एकूण ठेवी ३०२ कोटी झाल्या असून चालू आर्थिक वर्षांत जानेवारी २०२४ अखेरपर्यंत ४९ कोटी ५० लाख ठेवी नव्याने संस्थेत गुंतवल्या गेल्या. ४२१ ठेव खात्यात मिळून ही ठेव रक्कम जमा झाली.
नववर्ष स्वागत ठेव योजनेचा अंतिम दिवस असून दि.३१ जानेवारी २०२४ रोजी नववर्ष स्वागत ठेव योजना पूर्ण होणार आहे. स्वरूपानंद पतसंस्थेने अत्यंत आकर्षक तेवढीच सुरक्षित अशी ठेव धोरणे राबवून ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत केला आहे. उत्तम आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण पूर्ण वसुली प्रमाण २३% च्या वरती भांडवलपर्याप्तता प्रमाण 0%, NPA २५% च्या प्रमाणात गुंतवणुकीचे राखलेले प्रमाण सातत्याने प्राप्त होणारा ऑडिट अ वर्ग, आर्थिक शिस्तीचे पारदर्शक अर्थकारण, उत्तम ग्राहक सेवा, संस्था आणि ग्राहक यांचे स्नेहबंध या सगळ्यामुळे स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण सातत्याने उच्चांकी होत आहे.
ठेव योजनेच्या या अंतिम दिवशी ठेवीदारांनी मोठी गुंतवणूक करण्याची संधी साध्य करावी असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले. स्वागत ठेव योजनेचे अखेरचे दिवशी स्वरूपांजली ठेव (१२ ते १४ महिने) सर्वसाधारण ७.७५% व ज्येष्ठ नागरिक/महिला ८.००%, स्वरूपांजली ठेव (१५ ते १८ महिने) सर्वसाधारण ८.००% व ज्येष्ठ नागरिक/महिला ८.२५%, सोहम ठेव योजना (१९ ते ३६ महिने (मासिक व्याज)) सर्वसाधारण ८.२५% व ज्येष्ठ नागरिक/महिला ८.५०%, सोहम ठेव योजना (१९ ते ३६ महिने (पुनर्गुंतवणूक)) सर्वसाधारण ७.५०% व ज्येष्ठ नागरिक/महिला ७.७५% असे व्याजदर राहणार असून या अंतिम दिवशी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ठेव स्वीकारली जाईल अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com