
पालकमंत्री अनिल परब रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा कोटा वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार
कोकणात येणार्या चाकरमानी मंडळींचे प्रमाण गणपती उत्सवाच्या निमित्ताने वाढणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा कोटा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती पालकमंत्री अँड. अनिल परब यांनी दिली.
जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हयातील कोरोना स्थितीची माहिती त्यांनी घेतली. तसेच मोठ्या प्रमाणावर तपासण्या होवूनही रूग्णसंख्या कमी होत नाही. याबाबत प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. चिपळुणातील खासगी कोविड रूग्णालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिसर्या लाटेची शक्यता असल्यामुळे ती यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनास ते ताब्यात घेवून पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. www.konkantoday.com