
चिपळूण येथे लाईट दुरूस्तीसाठी सिंधुदुर्गातून टीम दाखल
चिपळूण येथे उदभवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटींगमध्ये पाणी जावून बंद पडल्या आहेत. नुकसान झालेल्या घरांमधील लाईट दुरूस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत १०० इलेक्ट्रीशियन्सची टीम चिपळूण येथे दाखल झाली. दोन दिवस हे मदतकार्य केले जाणार आहे. वीज फिटींगसाठी आवश्यक असणारे साहित्य, वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर, स्विच, ट्रीपर आदी वस्तू सोबत नेण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com