
कोतवडे गावातील मुख्य रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात न बुजवल्यास रास्तारोको kotawade road
तालुक्यातील कोतवडे गावातील मुख्य रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात बुजविण्यात आले नाही तर रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा समविचार संघाने बांधकाम विभागाला दिला.
समविचार संघटनेच्या पदाधिकार्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेवून समस्यांचे निवेदन दिले आणि चर्चा केली. वर्षभरापूर्वी सामाजिक कार्यकर्ते, तरूण, सेवानिवृत्त कर्मचारी, महिला यांनी एकत्र येवून कोतवडेत समविचारी संघटना गावात तयार केली आहे.
आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ समविचारी गाव संघटनेच्या सहकार्याने रास्तारोको करेल, असा इशारा यावेळी संघटना पदाधिकार्यांनी दिला आहे. यावेळी अरूण पेडणेकर, महेश कांबळे, हरिश्चंद्र धावडे, महेश कांबळे, दया पोवार, सुहास शितप, विश्वास बारगोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com