युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा सुरु yuvasena new president
युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यानं त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं प्रमुखपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. ठाकरे कुटुंबाबाहेर पहिल्यांदाच महत्वाचे पद जाणार आहे. गेले काही दिवस वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरु केलेत. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
There are chances to get new president for yuva sena
या पार्श्वभूमीवर तरुणांची फौज शिवसेनेच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न युवासेनेकडून सुरू आहे. पण आदित्य ठाकरे मंत्रिपदी व्यस्त असल्यानं युवासेनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झालीय.
www.konkantoday.com