
खेडशी नळपाणी योजनेत आर्थिक गैरव्यवहार, जिल्हा परिषदेकडून खुलाशाची मागणी
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी ग्रामपंचायत अंतर्गत नळपाणी योजनेतील लाभार्थ्यांचे दरमहा वसुली ही सरकार भरणा न करता त्या रकमेत अपहार झाल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाकडे झालेल्या तक्रारीच्या चौकशीतून समोर आली आहे. या प्रकरणी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्रामपंचायत खेडशी यांनी संंबंधित दोषींवर कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने खुलासा मागवला आहे.
खेडशी येथे नवेदरवाडी, नवीन वसाहत, गयाळवाडी येथील ग्रामस्थांना नळपाणी योजना ४ वर्षापूर्वी चालू झाली हाेती.
www.konkantoday.com