कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत नवीन निर्णय coronavaccine
देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरणकरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेत आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे .
Time span to be reduced between two corona vaccines
सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक V. या तिन्ही लशींचे दोन डोस घेणं गरजेचं आहे आणि त्या दोन डोसमध्ये विशिष्ट अंतर आहे.कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या १२ ते १८ आठवडे आहे. पण ते आता पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आता कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या तयारीत आहेत.
पण हे अंतर फक्त ४५आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी असेल असे सांगण्यात येत आहे
www.konkantoday.com