समर्थन करणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशा दहशतीचा अनुभव आल्यास त्याने तात्काळ स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करावी.-रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष अँड.शशिकांत सूतार

कोकणच्या विकासामध्ये महत्वपूर्ण ठरणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना काहीजण धमक्या देत आहे. समर्थन करणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशा दहशतीचा अनुभव आल्यास त्याने तात्काळ स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करावी. समर्थन करणाऱ्या सर्व संघटना व आपल्या सोबतची वकील मंडळी त्यांच्या सोबत तातडीने उभे राहतील, याची ग्वाही रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष अँड.शशिकांत सूतार यांच्यासह अन्य रिफायनरी समर्थक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रिफायनरी समर्थकांना धमक्या दिल्याबददल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी समन्वय समिती अध्यक्ष अँड.सूतार, बारसू- गोवळ- शिवणे- दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती अध्यक्ष हनिफ काझी, नाटे- सोलगाव- देवाचेगोठणे दशक्रोशी समर्थक समितीचे डॉ.सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.वेगवेगळ्या व्हाट्सअप गुपवर प्रकल्पाबाबत नाहक गैरसमज पसवणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, अथवा अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या मेसेजेसचे क्रीन शॉट घेऊन तसेच कोणत्याही स्वरूपाच्या दहशतीचा मार्ग अवलंबणाऱ्या सर्व विरोधकांची एक यादी तयार करावी व त्याचे संकलन करून त्याची माहिती आमच्यापाशी जमा करावी. अशा सर्व संबंधित व्यक्तींची माहिती सरकार तसेच प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करण्यात येईल, व त्यांना प्रकल्पातील नोकऱया अथवा व्यवसायात समाविष्ट करू नये अशा स्वरूपाचे लेखी निवेदन सरकार व प्रकल्प अधिकाऱ्याकडे समितीमार्पत करण्यात येईल, असेही या पसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button