लसीचे दोन्ही डोस घेऊनही फायदा नाही रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतूमध्ये अडवणुकीचे धोरण ,नागरिकांच्याच असंतोष ratnagiri setu office
एकीकडे लसीकरण करून घ्यावे म्हणून शासन जनतेला आवाहन करीत आहे दोन्ही लसी झालेल्या नागरिकांना निर्बंध पाळून सूट देण्याच्या विचारात शासन असतानाच रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या असलेल्या सेतू मध्ये येणार्या नागरिकांची नियमावर बोट ठेवून अडवणूक केल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे या अडवणुकीच्या धोरणामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू मध्ये अनेक नागरिकांना वेगवेगळ्या दाखल्यांसाठी जावे लागत आहे यासाठी गावागावातून लोक याठिकाणी येतात कोरोना च्या पाश्र्वभूमीवर सेतू कार्यालयाबाहेर आरटी पीसीआर टेस्ट केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे फलक लावलेले आहेत मात्र ज्यांनी लस घेतलेली नाही त्या बाबतीत या नियमाची अंमलबजावणी केली तर मान्य आहे आज सकाळी सीताराम सावंत नावाचे नागरिक सेतू कार्यालयात अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला सावंत यांनी आपले लसीकरणाचे दोन्ही डोस झाले असल्याचे सांगितले व तसे दाखविले परंतु त्यांचे कोणतेही ऐकून न घेता त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला यामुळे सेतूच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
शेजारी असलेल्या रजिस्टर ऑफिसमध्ये मात्र दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रजिस्ट्रेशनसाठी परवानगी आहे त्यामुळे शासनाचेच नियमाना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकष लावले जात आहेत दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तहसीलदारांनी दुकानदारांसाठी काढलेल्या आदेशात देखील ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्या आहेत कोरोना टेस्ट आवश्यक नसल्याचे म्हटले आहे मग जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या संघटनेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सेतू कार्यालयात मात्र हा नियम का ? असा सवाल उपस्थित होत आहे विशेष म्हणजे सेतू कार्यालय बाहेर लावण्यात आलेल्या फलकावर हा आदेश देखील तहसीलदारांनी काढल्याचे म्हटले आहे मुळात शासनदेखील न्यायालयात सांगत आहे की आमचे लसीकरण पूर्ण झाले आम्ही निर्बंध उठवू मग ज्या नागरिकांनी दोन्ही लसीकरणाचे डोस पूर्ण केले आहेत त्यांना अशाप्रकारची वागणूक का दिली जात आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी नागरिकांची आहे अन्यथा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या लसीकरणाला कोणताही अर्थ उरणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे
www.konkantoday.com