रत्नागिरीतील व्यावसायिक व्यापारी अस्थापना सायंकाळी ७.०० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी – ॲड दीपक पटवर्धन ratnagirilockdown
लॉकडाऊन नंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी अस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही या मर्यादित वेळेत व्यापार उद्योगाला चालना मिळताना दिसत नाही. तसेच ग्राहकांनाही सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० ह्या वेळेत खरेदी करताना कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सांभाळताना कसरत करावी लागते. कार्यालयीन कामाच्या वेळाही सायंकाळी ४.०० वाजता संपतात त्यामुळे खरेदी करतांना अडचणी होत आहेत. प्रामुख्याने शहरी भागातील जनतेची मोठी अडचण होत आहे. तसेच व्यापारी वर्गावरही या वेळेच्या मर्यादेचा अनिष्ठ परिणाम होत आहे.
Bjpdemands for opening of shops in ratnagiri district till 7pm president deepak patwardhan
अशा स्थितीत सायंकाळी ४.०० वाजता बंद होणारा व्यापार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर किमान ३ तास सुरू ठेवल्यास ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांनाही सोयीचे ठरेल. ३ तासाची मर्यादा वाढवून ग्राहकांची सोय व्हावी. तसेच व्यापारातील गिऱ्हाईकांची उलाढाल वाढावी. यासाठी स्थानिक प्रशासनाने साधक-बाधक विचार करून ३ तासांची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी आज भा.ज.पा.च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. व्यवसायिकांना त्यांच्या अस्थापना सायंकाळी ४.०० वाजता बंद न करता सायंकाळी ७.०० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचेकडे भा.ज.पा.च्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. यांनी दिली