रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मोबाईल बँकींग सेवा लवकरच सुरू होणार ratnagiridistrictcooperative bank

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोबाईल बँकींग लायसन्स प्राप्त झाले असून बँकींग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ बँकेच्या ग्राहकांना होणेसाठी मोबाईल बँकींग सुविधा लवकरच उपलब्ध करून देणेत येत आहे. या सुविधेअंतर्गत मोबाईल बँकींग ऍप, IMPS (Immediate Payment Service व UPI (unifide Payment interface) या सुविधा बँकेच्या ग्राहकांसाठी कार्यान्वित करणेत येणार आहेत.

ratnagiridistrictcooperative bank to start mobile banking facility soon


सद्यस्थितीत बँकेच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून CTS, SMS Alert, एटीएम, POS एटीएम E commerce,, डीबीटी (DBT- Direct Benifit Transfer) सुविधा PFMS (Public Financial Management System, FLC (financial Management System, FLC (Financial Literacy Centre), मोबाईल एटीएम व्हॅन इ. सुविधादेखील उपलब्ध करून देणेत आल्या आहेत. सध्या बँकेमार्फत लवकरच मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे ग्राहकांना सेवा दिली जात आहे. परंतु बँक आणखी ०२ मोाबईल एटीएम व्हॅन खरेदी करणार असून त्याद्वारे ग्राहकांना जिल्ह्यातील ०९ तालुक्यातील एटीएम सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. या सुविधांबरोबरच मोबाईल बँकिंगची सेवा देखील ग्राहकांना लवकरच मिळणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button