मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठकीत कोकणसाठी महत्वाचे निर्णय Important decision for konkan

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी झाली. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय झाले. आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी ११ हजार ५०० कोटींची तरतूद, जालन्यात मनोरुग्णालय, कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना ७ वेतन आयोग आणि जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयासाठी जमीन देण्याचा निर्णय हे चार महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले

Important decisions taken by cm uddhav thakare for konkan flood affected area


अतिवृष्टीने आलेले पुराचे संकट तसेच दरड कोसळण्याच्या घटना याचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने ११ हजार ५०० कोटींच्या तरतुदीस मान्यता दिलीमंत्रिमंडळाच्या बैठकीत या तरतुदीवर शिक्कामोर्तब झाले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला मदतकार्याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले.
महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळ काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा.
कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प (काळू, शाई, काळ ई.) येणाऱ्‍या ३ वर्षात पूर्ण करा.
कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्यावा.
डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा.
कोकणाच्या २६ नदी खोऱ्‍यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात स्थापित करा.

  1. जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय
    राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये कार्यरत असून सद्यस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हा अंदाजे १०४.४४ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button