रत्नागिरी नगर परिषद आणि M I D C येथून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात जास्त प्रमाणात ब्लिचिंग पावडर, पावडरच्या वासाच्या घमघमाटाने नागरिक हैराण ratnagiri municipality water supply

रत्नागिरी नगर परिषद आणि M I D C येथून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात जास्त प्रमाणात ब्लिचिंग पावडर मिसळण्यात येत आहे या पाण्याच्या वापरामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे . एक हजार लिटरसाठी कीती ब्लिचिंग घालावी याचे प्रमाण ठरलेले आहे पण या प्रमाणाला हरताळ फासून पूर्ण पोती पाणी पुरवठा करण्याऱ्या टाकीत रिकामी केली जात आहेत या पाण्याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा नाही त्यामुळे पाणी न तपासताच संपूर्ण शहरात वितरीत केले जातेय .

Excess amount of bleaching powder added by ratnagiri municipality and MIDC in water supply

पाणीफिल्टर केले जाते याठिकाणी कामावर असणारा कर्मचारी आपल्या हिशेबानुसार ब्लिचिग मिसळत आहेत ते किती पावडर मिसळत आहे याच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही त्यामुळे शहरात घरात पाणी आल्यावर व. पाणी उकळवल्यानंतर ही ब्लिचिंग चा उग्र वास येत आहे ब्लीचींगचे प्रमाण जास्त झाल्यास त्यामुळे केस गळणे , शरीरावर सुरकुत्या पडणे डोळे लाल होणे इत्यादी त्रास जाणवू लागले आहेत हे असेच चालू राहिले तर त्याचे परीणाम शरीरातील अन्य अवयवांवर होऊ शकतात यासाठी शहराला पुरविणार्या पाणी साठ्यामध्ये ब्लिचिंग योग्य प्रमाणात मिसळले आहे की नाही याची पाहणी करून व तपासणी करुनच पाणी सोडण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button