
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट हलक्या वाहनांसाठी सुरु ratnagiri-kolhapur amba ghat
रत्नागिरी – रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय राजमार्ग क्र. 166 वरील साखरपा ते आंबा या घाट भागात मुसळधार पावसामुळे बारा ठिकाणी दरड कोसळून महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. सदर महामार्गाच्या साखरपा ते आंबा या लांबीमध्ये पडलेले मातीचे ढिगारे काढून महामार्ग 05 ऑगस्ट 2021 पासून लहान वाहनांसाठी जसे कार, जीप, ॲम्ब्युलन्स, मालवाहतुकीचे लहान वाहने इत्यादींच्या वाहतुकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे.
Roads open for light vehicles on ratnagiri kolhapur highway in ambaghat which was closed due to landslide in that region
तसेच कि.मी. 71.400 या ठिकाणी मुख्य दुरुस्ती करण्याचे काम सुरु असून सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहने, मालवाहतुकीची मोठी वाहने व राज्य परिवहनाच्या बसेस इत्यादी करीता महामार्ग सुरु करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक परियोजना कार्यान्वय इकाई-कोल्हापूर यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com