
पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत देऊन अपमान नको – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राजू जाधव chiplunfloods
संपूर्ण कोकणात आणि विशेषतः चिपळूण, खेर्डी परिसरात २१, २२, २३ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यास पुढची दहा वर्षे कमी पडतील, अशा परिस्थितीत राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करून संबंध कोकणवासियांचा अपमानच केलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोकणवासियांच्या दुःखावर मीठ न चोळता येथील सर्व पूरग्रस्त, व्यापारी आणि सर्व संबंधित घटकांना भरघोस मदत जाहीर करून त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राजू जाधव यानी शासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com