चिपळुण नगरपालिका पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान,महापुरात २१ हजार पुस्तके भिजली Dr.Babasaheb ambedkar library chiplun
अतिवृष्टी आणि महापुराचा लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला फटका बसला आहे. तसेच चिपळुण नगरपालिका पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाचकांचे हक्काचे दानल पुन्हा उभे राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Dr.Babasaheb ambedkar library badly affected in chiplunflood
चिपळूणला वाचन संस्कृतीची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिरासह चिपळूण नगरपालिका पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे जसे नुकसान झाले आहे त्याच पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या वाचनालयातील २१ हजार पुस्तके, २ संगणक, इर्न्व्हटर व फर्निचर महापुरात बुडाली. आता ती पुन्हा उपयोगात येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत या वाचनालयाचे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com