चिपळुणात आलेल्या महापूराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार- नाना पटोले nanapatole on chiplun flood

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळुणात आलेला महापूर नैसर्गिक आपत्ती असली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे आले आहेत. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. तसेच भविष्यात या दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील याचे देखील निवेदन दिले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार नसीम खान, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार हुस्नबानू खलिफे प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, पत्रकार युवराज मोहिते, प्रभारी मनोज शिंदे, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्दे शहराध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित होते.

Nana patole demands investigation in chiplun flood


चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे व त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी, नागरिक, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले असून जीवितहानी देखील झाली आहे. चिपळूण शहरासह १८ गावे बाधित झाली आहेत. शासनाने कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र ही मदत भरपूर आहे असे मान्य करत नाही तरी मागील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ची मदत पाहता ही भरीव मदत केली गेली आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासनाने भरीव मदत करावी, तसेच व्यापार्‍यांना कमी व्याज दरात कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधत असताना इन्शुरन्स कंपन्या व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत प्रांतांना काही सूचना केल्या आहेत यामध्ये इन्शुरन्स कंपन्यांना तातडीने नोटीस आकडा तसेच वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार प्रांतांना आहेत, असे पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button