करोना परिस्थितीमुळे आता महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा ही १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार maharshtra scholarship exam
करोनामुळे अनेक परीक्षांच्या तारखांचा गोंधळ उडालेला आपण पाहत आहोत. काही परीक्षा तर घेयच्या की नाही, परीक्षा होणार असतील तर त्या कोणत्या पद्धतीने घेयच्या इथं पासून सुरुवात आहे. ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या तारखांचा गोंधळ तर सातत्याने होतचं आहे. एक तारीख जाहीर करून पुन्हा ती बदलली जात आहे. अशातच आता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तारीख आधी ८ ऑगस्ट होती. ही तारीख एक दिवसाने पुढे ढकलून ९ ऑगस्ट करण्यात आली होती. आता या तारखेतही बदल करण्यात आला आहे.
maharshtra scholarship exam dates on 12th august
करोना परिस्थितीमुळे आता महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा ही १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणारे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु या वर्षी या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरला आहे
www.konkantoday.com