
झूमकारचा आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार,वाचा कुठच्या देशात केला विस्तार zoom car expansion in foreign countries
~ इजिप्त आणि फिलिपाइन्समधील कंट्रीहेडची नियुक्ती जाहीर ~
मुंबई, ४ ऑगस्ट २०२१: नवोदित बाजारपेठेत पकड जमवत झूमकार या सर्वात मोठ्या कार शेअरिंग मार्केटप्लेसने आज आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केल्याचे जाहीर केले. झूमकारने, भारतातील सेल्फ-ड्राइव्ह कार रेंटल मार्केटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अग्नेय आशिया आणि मध्य पूर्वेत विस्तार केला. तसेच बिझनेस वाढवण्याकरिता फिलिपिन्स आणि इजिप्तमध्ये कंट्रीहेडची नियुक्ती केली.
zoom car expansion in foreign countries.Appointed country head in Egypt and Philippines
उपाध्यक्ष आणि कंट्री हेड हेनी ओलामा हे इजिप्तमधल झूमकारचे काम पाहतील. झूमकारमध्ये रुजू होण्यापूर्वी हेनी यांनी मेना भागातील काही मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी अरबीअॅड्स, कॅरेफोर, रया इलेक्ट्रॉनिक्स, एनलाइट आणि डेअर न डील या कंपन्यांमध्ये डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, रिटेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ग्रुप बाइंग इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे.
जेन अँजेलो फेरर हे फिलिपिन्समधील कंपनीच्या विस्तारात उपाध्यक्ष आणि कंट्री हेड म्हणून रुजू झाले. जेने यांनी यापूर्वी २०१८ मध्ये फिलिपिन्समध्ये डोस्टॅविस्टाच्या रशियन आधारीत क्राउडसोर्सच्या प्रवेशावेळी डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये नेतृत्व केले. फिलिपिन्सच्या मार्केटमध्ये मिस्टर स्पीडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेने यांनी कंपनीच्या वृद्धी दरात वार्षिक आधारावर दैनंदिन महसूल आणि एकूण दैनंदिन डिलिव्हरीमध्ये विक्रमी वाढ नोंदवली.
जेने आणि हॅनी यांना दशकभरात अनुभव असून त्यांच्या स्टार्टअप मॅनेजमेंटमधील तज्ञता फिलिपिन्स आणि इजिप्तमध्ये झूमकारला पहिला कार-शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून सिद्ध करण्यात महत्त्वाचे ठरेल.
झूमकारचे सीईओ आणि सहसंस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले, “झूमकारमध्ये आम्ही नेहमीच वैयक्तिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची हीच योग्य वेळ आहे. लोकांना बाहेर पडून प्रवास करायचा आहे, त्यांना पुन्हा सामाजिक व्हायचे आहे. फिलिपिन्स आणि इजिप्तसारख्या ठिकाणी वाहन मालकीचे प्रमाण कमी आहे, पण फिरणारी लोकसंख्या भरपूर आहे. वाहनाची उपलब्धता नसणे आणि स्वस्त वाहतूक नसल्याने या संधीचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे. हॅनी आणि जेन या आमच्या नव्या कंट्री हेडचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा आक्रमकपणे विस्तार करण्यासाठी त्यांच्या कौशल्याची मदत होईल. यातून आमच्या वाढीस हातभार लावणारी भागीदारी निर्माण केली जाईल. अग्नेय आशियातील इतर देश तसेच मेनामध्ये विस्तारण्याकरिता इजिप्त आणि फिनिपिन्सचे उदाहरण आदर्श ठरेल.”