राष्ट्र सेवादल मिरज पथकाने पूरग्रस्तांची घरे केली प्रकाशमान

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ असतांना. राष्ट्रसेवादल मिरज येथील इलेक्ट्रीकल दुरुस्ती पथकाने पुरग्रस्त भागातील अनेक घरे प्रकाशमान केली. सेवादलाचे वरीष्ठ पदाधिकारी सदाशीव मगदूम हे मिरज येथून 20 जणांचे पथासह चिपळूण येथे दाखल झाले. या पथकातील इलेक्ट्रीयन आणि प्लंबर यांनी पुरग्रस्त भागात घराघरात जाऊन तेथील बंद पडलेले इलेक्ट्रीक कनेशक्शनन्स, पाण्याचे पंप याची दुरुस्ती करत अनेक घरे पूरपरिस्थितीतल 8 दिवसाच्या अंधारानंतर प्रकाशमान केली तर अनेक मोटर पंप चालू करत घरात पीण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. 22 जुलैच्या महाप्रलयानंतर गर्द अंधारात बूडालेल्या पुरग्रस्त चिपळूण शहर आणि परिसराला मदतीचा आधार देण्यासाठी राष्ट्र सेवादल धावून आले. सेवादलाच्या रत्नागिरी सेवा पथकाने मातृमंदिरच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे मदत कीट पेठ माप येथील पुरग्रस्त जनतेला वाटले. 30 जणांच्या सेवादल पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिखलमुक्त उपक्रम घेत 22000 पुस्तकांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. संपुर्ण चिखल पाण्यात बुडालेल्या ग्रंथालयाची स्वच्छता केली. यात नवनिर्माण रत्नागिरी महाविद्यालयांच्या विद्यार्थांचा सहभाग मोठा होता. राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी कोकणच्या पूरग्रस्त भागाला सर्व ते सहकार्य आणि मदत करण्याचे आवाहन केले. आणि अनेक पातळीवर सेवादलाच्या माध्यमातून मदत सुरु झाली. यात सेवादल मुंबई, सेवादल मानवलोक आंबेजोगाई, मिरज, येवले, पुणे, कोल्हापूर, मातृमंदिर देवरुख आदी सेवादलाच्या विविध शाखा आणि संलग्न संस्था यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. चिपळूण येथे या काळात परिस्थिती अशी होती की महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध संस्था, व्यक्ती, मीत्र मंडळे आपल्या आपल्या शक्यते नुसार धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पाणी आदी साहित्य ट्रक भरुन भरुन आणत होते. आणि मदत वाटप करत होते. यात प्रामुख्याने जे लोक या ट्रक समोर तातडीने धावत जात त्यांनाच मदत मिळत होती. आणि प्रत्यक्षात ज्यांचे त्याहीपेक्षा अधिक नुकसान आहे. गरजवंत आहेत त्यांच्या पर्यंत मदत पोहोचत नव्हती.
याचा अभ्यास करत राष्ट्रसेवादल चिपळूण कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वगळता महिलांसाठी कपडे, अंतर्वस्त्र, चादरी, चटया, आदी वस्तूंची नोद केली आणि त्याची मदत मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आली. मानवलोक आंबेजोगाई चे अनिकेत लोहीया यांची टीम पेढे येथील मोंडकर कुटुंबीयांना भेटली आणि त्यांना मदतीचा हात दिला. जेष्ट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्र सेवादल पुनर्वसन कार्यात सहभागी होत काही भागांना भेट देत पुरग्रस्तांचे सांत्वन केले, मदत वाटप केले आणि याकार्यासाठी सेवादल मुंबई एक लाखाचा निधी पुरग्रस्तांसाठी दिला. राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी येवले येथून खास मदतीसह पुरग्रस्तांना वाटप केले. मुंबई येथून राष्ट्रसेवादलाची 14 डॉक्टरांची टीम चिपळूण येथे सलग चार दिवस होती त्यांनी कालूस्ते, भूरणवाडी, भोगाळे, चिपळूण बाजारपेठ, सती, मुरादपूर, मिरजोळे, कोंड आदी ठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प घेत रुग्णांवर मोफत उपचार करत शेकडो रुग्णांना तपासले आणि औषधे दिली. या आरोग्य कॅम्पला मोठा प्रतिसाद लाभला. मुंबईची युवक युवती पथक आणि मिरज येथील सेवादल पथक, दंडवते कृषि विद्यालय मातृमंदिर देवरुख पथक यांनी मुरादपूर, गांधारेश्वर येथील महात्मा गांधी स्मारक, प्राथमिक शाळा, रुग्णालये आदी अनेक भागात श्रमदान करत स्वच्छता केली, अनेक घरांना आणि रस्ते येथील चिखल साफ करत वाटा मोकळ्या केल्या.या उपक्रमात सतीश कामत, आत्माराम मेस्त्री, शरयू इंदूलकर, स्मृती राणे, अनिकल काळे, सुनिता गांधी, मल्हार इंदूलकर, रमाकांत सकपाळ, सुनिल खेडेकर, सई खातू-वरवाटकर, शिल्पा रेडीज, जाफर गोटे, सदाभाऊ मगदूम, विकास घारपूरे, युयुत्सू आर्ते, रेवा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. राष्ट्र सेवा दलाने चिपळूण पुरग्रस्त भागात सुरु केलेला मदत आणि श्रमदानाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. मुंबई आणि राज्याच्या इतर भागातील अनेक हितीचिंतक सेवादल सैनिक तसेच अन्य सहयोगी संस्था आणि अनेक मित्रमंडळ ग्रुप यात सहभागी होत आहेत. याबद्दल राष्ट्र सेवादल राष्ट्रीय समिती सदस्य अभिजित हेगशेट्ये यांनी देणगीदाराचे आभार व्यक्त करतांनाच पुरग्रस्त चिपळूण परिसराच्या उभारणी संदर्भात राष्ट्र सेवादल नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार आहे. यात येथील अखेरच्या पुरग्रस्त घटकाला त्याच्या पायावर उभारणीसाठी आधार द्यावा तसेच अल्प उद्योगावर गुजराण करणाऱ्या महिलांना आधार मिळावा अशी योजना हाती घेतली जाणार आहे. याचे अंतिम नियोजन राष्ट्रसेवादल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या सोमवार दिनांक 9 ऑगस्टच्या भेटीत निश्चित होणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button