रत्नागिरीत दुकाने उघडण्यास परवानगी मात्र दुकानदार व कर्मचाऱ्यांना दुसरे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक अन्यथा कोरोना टेस्ट करावी लागणार
कोविड -19 चा प्रार्दुभावरोखण्यासाठी उपाययोजना करणेबाबत जिल्हा प्रशासनाकडून शहरातील दुकानदाराना सूचना देण्यात आल्या आहेत रत्नागिरी जिल्हा हा तिसऱ्या टप्प्यात आल्याने सर्व प्रकारची दुकाने चार वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे कोविड 19 चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जमाव होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणीखबरदारी घेणे आवश्यक आहे. रत्नागिरी शहरातील सर्व दुकानांच्या आस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचारीतसेचदुकानदार यांचे कोविडदुसऱ्या लसीकरणाचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावण्यात यावे. तसेच दुकानात नागरीकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्राहकांना मास्क लावल्याशिवाय दुकानातप्रवेश देऊ नये. सॅनिटायझर वापरणे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेबाबत सूचना ग्राहकांना देण्यातयाव्यात असेही प्रशासनाने सांगितले आहे . तसेच ज्यांचे कोविड 19 चे लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांची टेस्ट नगर परीषदेचे फिरते पथक करणार असल्याने सदर टेस्टींगचे कर्मचारी आल्यास त्यांना सहकार्य करावे. सदरच्या सूचना शहरातीलसर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहचतील याची दक्षता घ्यावी.तसे पत्र व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी पाठविले असून तशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यास सुचविले आहे
www.konkantoday.com