नाशिक येथील ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल,आजच संमेलनाची तारीख सांगणे अशक्य -कौतिकराव ठाले पाटील
नाशिक येथील ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल, असा निर्णय आज साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ. मात्र, आजच संमेलनाची तारीख सांगणे अशक्य आहे. परंतू संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकर घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com