चिपळूणातील पुराच्या पाण्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.-शौकतभाई मुकादम
चिपळूण शहरामध्ये अनेक वेळा पूर आला, पावसाच्या पाण्याने येणार्या पुराची पातळी हळुहळू न वाढता चिपळूणमध्ये पुराची नदी वाहत होती हे कसे काय? सुरूवातीपासूनच अचानक आलेल्या पुराच्या पाण्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही. पुराच्या पाण्याने चिपळूणमध्ये होत्याचे नव्हते झाले. काही वर्तमानपत्रांमध्ये व टीव्ही चॅनेलवर धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूर आला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यावर संबंधित अधिकार्यांनी खुलासे केले की धरणाचे पाणी नसून पावसाचे आहे, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. अधिकार्यांच्या या म्हणण्यामध्ये व खुलाशामध्ये वेगवेगळ्या अधिकार्यांच्या बोलण्यामध्ये तफावत दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा महापूर आला की कोळकेवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे याची चौकशी केंद्रीय आपत्ती निवारण पथकाकडून व महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी यांची समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
www.konkantoday.com