
कोरोनामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गेली दोन वर्ष चांगलीच खीळ बसली
कोरोनामुळे नागरिकांच्या जीवावर संकट कोसळलेले असतानाच गेली दोन वर्ष विकासालाही चांगलीच खीळ बसली आहे. सलग दुसर्या वर्षी जिल्हा नियोजन विभागाला २५० कोटींपैकी केवळ ७८ कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र नियोजन समितीचा सर्व निधी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याची अट शासनाने घातल्याने इतर विकास ठप्प झाला आहे. आता पर्यंत ७८ कोटींपैकी १२ कोटी रु. वितरित करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com