सरकारी मत्स्यसंवर्धन तलावातील खेकडे चाेरुन चोरटय़ांनी साजरी केली आखाडी
आपण आतापर्यंत सोने दागिने मोबाईल चोरीच्या घटना ऐकत आलो आहोत मात्र रत्नागिरीत आता चक्क खेकड्यांची चोरी झाली आहे सरकारी मत्स्यसंवर्धन तलावातील खेकडे काढून घेऊन बहुतेक चोरट्यांनी आखाडी साजरी केली असावी असा अंदाज आहे . चोरट्याने तब्बल १२ हजार रुपये किंमतीच्या खेकड्यांची चोरी केली आहे. वरिष्ठ संशोधक फिलो केंद्रीय निखारे मत्स्यसंवर्धन संस्था, चेन्नई अंतर्गत शहरातील परटवणे येथे मत्ससंवर्धन तलाव आहे. या तलावातून २५ जुलै ते २६ जुलै दरम्यान अज्ञात इसमाने ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे एकूण १५ किलो खेकडे म्हणजे साठ मोठे खेकडे चोरीला गेल्याची तक्रार येथील व्यवस्थापिका श्वेता पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात केली आहे या ठिकाणी छोटा खेकड्यांचे पालन करून त्यांना मोठे केले जाते यासाठी त्यांना रोज खाद्य घातले जाते त्यावेळी खेकडे चोरीला गेल्याची घटना येथील व्यवस्थापनाला लक्षात आली.त्यानंतर आता पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस खेकडे चोरांच्या शोधात आहेत
www.konkantoday.com