
लांजा पूर्व भागातील नावेरी नदीला आलेल्या महापुराने बाधीत झालेल्या पुरग्रस्तांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा मदतीचा हात.
लांजा तालुक्यातील पुर्व भागातील जीवनवाहिनी असलेल्या नावेरी नदीला आलेल्या महापुराने कोंडगे व रिंगणे गावातील अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी भरल्याने मालमत्तेचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. याच वेळी वशिष्टि नदीला आलेल्या महापुरात चिपळुण शहर उध्दस्त झाले होते. विशिष्टीच्या पुराची तीव्रता व चिपळूणचे भयानक असे झालेले नुकसान यामुळे एकुणच मदतीचा ओघ चिपळुणकडे वाढला आहे. चिपळूण पुरग्रस्तांच्या समोर *लांजा तालुक्यातील नावेरीचे पुरग्रस्त दुर्लक्षित झाले आहेत. अखेर नावेरी नदी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी याच मातीतील लांजा - राजापूर नागरिक संघ ही संस्था धावुन आली असुन पुरग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीचा अभ्यास पुर्वक आवश्यकतेनुसार संघाकडून मदत करण्यात आली आहे. संघाच्या मदतीमुळे नवी उभारी घेण्यास पुरग्रस्तांना मदत होणार आहे. *चिपळुणच्या वाशिष्टी नदी प्रमाणे लांजा तालुक्यातील नावेरी नदीला ही न भुतो :न भविष्यती असा महापुरा आला होता. या पुराचा सर्वात जास्त तडाखा जास्त करुन नदी किनारी वस्ती असलेल्या रिंगणे व कोंडगे गावांना बसला आहे.*यामध्ये नावेरीला आलेल्या पुरामुळे घरा समोरुन जाणा-या वहाळाचे पाणी तुंबले व कोंडगे पहिलीवाडी येथील काशिराम पातेरे यांच्या घरात घुसले व या पाण्याबरोबर उपकरणे व अन्नधान्य व कपडे वाहुन गेले. रिंगणे गांगोवाडी येथील अनेक घरांच्या चौथ-याला नदीचे पाणी लागले होते. तर पाटिलवाडीतील अनेक घरां मध्ये नदीचे थेट पाणी घुसले. मातीचे घर असलेल्या बाजीराव आयरे यांच्या चौथ-याला पाणी येऊन लागले होते. घरातल्या लोकांनी मिळून वस्तू इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पाण्याने घराला पुर्णत वेढा दिला. पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत गेली अखेर सर्व तसेच टाकुन बाजीराव आयरेंच्या परिवाराला घर सोडावे लागले. याचवाडीतील रहिवाशी राजु आयरे यांचे बौध्दवाडीच्या वहाळाशेजारी चिकन सेंटर आहे. नावेरीला आलेल्या पुरामुळेववहाळाचे पाणी तुंबले व ते दुकानात घुसले यात दुकानात असलेल्या कोंबड्या बुडुन जागीच मृत्यू पावल्या. याच वहाळाच्या बाजुला असलेल्या रत्नाकर कांबळे यांच्या मातीच्या घराला पुराचा तडाखा बसला असून यात घराच्या भिंती कोसळल्या. घराचे नुकसान झाले असुन घर धोकादायक बनले आहे. बाजुलाच असलेल्या डॉ. धरशिंम्बे यांच्या घरात तर नावेरी नदीचे थेट पाणी घुसले व काही समजायच्या आतच पुर्ण घर अर्धे पाण्यात बुडुन गेले. घरातील अन्नधान्य वाहुन गेले तर उपकरणे नादुरुस्त झाली आहेत.डॉक्टरांचे प्रचंड असे नुकसान झाले असुन नावेरीला आलेल्या पुरामुळे अनेक घरे व दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही मदतीच्या बाबतीत चिपळुणचे नुकसान जास्त असल्याने चिपळुणच्या तुलनेत नावेरी नदी पुरग्रस्त दुर्लक्षित झाले होते.
शेवटी ‘आपलेच आपल्या मदतीला येतात’ या म्हणी प्रमाणे याच मातीतील लांजा – राजापूर नागरिक संघ ही संस्था धावुन आली असुन पुरग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीचा अभ्यासपुर्ण आवश्यकतेनुसार मदत केली गेली आहे. यामध्ये काशिराम पाथेरे, बाजीराव आयरे, रामचंद्र आयरे, रत्नाकर कांबळे, मारुती पांचाळ व डॉक्टर धरशिंम्बे यांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. राजु आयरे यांना पन्नास कोंबड्या देण्यात आल्या असुन नव्याने व्यवसाय सुरु करण्यास मदत होणार आहे.
*या मदतवाटपासाठी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड सर , न्यू इंग्लिश स्कूल लांजा चे प्राचार्य मा.गणपत शिर्के सर, व्हेळ विद्यालयाचे महेंद्र साळवी सर, विजय हटकर सर, विनोद बेनकर सर,प्रमोद खामकर सर, आदर्श माजी विद्यार्थी संघटना प्रभानवल्ली खोरनिनको चे अध्यक्ष – विनायक बिजम ,सचिव मंगेश चव्हाण व माजी ग्रामसेवक सुधाकर पेडणेकर उपस्थित होते. राजापूर लांजा तालका नागरिक संघाने कोरोना काळातही भरिव कामगिरी केली होती ,त्याप्रमाणेच महापुराच्या वेळी हिच बांधिलकी जोपासत सामाजिक दायित्वाचा पुन: प्रत्यय दिला आहे
www.konkantoday.com