लस घेतल्यानंतरही नागरिकांनी घरीच बसायचे असेल तर लसीकरणाला काय अर्थ आहे,-उच्च न्यायालय
लस घेतल्यानंतरही नागरिकांनी घरीच बसायचे असेल तर लसीकरणाला काय अर्थ आहे, अशी टिप्पणी करत वकिलांसह सर्वसामान्यांना लोकल प्रवास नाकारणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्न उपस्थित के ला.
लशीच्या दोन्ही वा एक मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करण्याचे आणि त्यादृष्टीने धोरण आखण्याची सूचनाही न्यायालयाने सरकारला के ली. त्यावर, गुरुवारी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले.
www.konkantoday.com