लसीकरण मोहिम राबवताना होणारे घाणेरडे राजकारण, वशिलेबाजी, टाळण्यासाठी लसीकरणाच्या ठिकाणी रजिस्टर ठेवा – माजी सरपंच संतोष सावंत यांची मागणी
कोरोना लसीकरण हा शासनाचा अधिकृत कार्यक्रम आहे आणि तो लोकांच्या जीवाशी निगडीत आहे आणि आपल्या गावातील/शहरातील प्रत्येक नागरिकाचा तो हक्कच आहे त्यामुळे त्यामधे घाणेरड राजकारण किंवा क्लिष्ट पध्दतीने ते राबवू नये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे असे प्रतिपादन नाचणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष सावंत यांनी केले आहे ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे आणि जीथे आनदिस्पाॅट नोंदणी करायची आहे अशा ठिकाणी शासनाच्यावतीने नागरिकांची नाव नोंदणी करून घ्यावी त्यासाठी त्या ठिकाणी रजिस्टर ठेवण्यात याव त्या नाव नोंदणीप्रमाणे लसीकरण होत आहे कि नाही यावर शासकीय यंत्रणेने नियंत्रण ठेवावे त्यामुळे लसीकरण मोहिम राबवताना होणारे घाणेरडे राजकारण, वशिलेबाजी, बाजूला होईल आणि पारदर्शिकते मधे हां राष्ट्रीय कार्यक्रम पार पडेल ही व्यवस्था तातडीने अंमलात आणावी अशी विनंती सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
www.konkantoday.com